Month: April 2024

पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार- रोहीत पवार

पिंपरी: अजित पवार जरी आपला मुलगा पार्थच्या पराभव विसरून त्याला पराभूत करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारात गुंतले असले तरी मी माझा भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार म्हणजे घेणारच असा विडा आज…

सांगलीतील बंडखोरीवर गुरुवारी काँग्रेसची बैठक

सांगली : काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीतून बंडखोरी केल्याने उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक गुरूवार दि. २५ एप्रिल रोजी सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना…

आली लहर, केला कहर अमरावतीमध्ये राडा

स्वाती घोसाळकर अमरावती : एकीकडे कडक उन्हाने अवघ्या महाराष्ट्राला घायकुतीला आणले असतानाच दुसरीकडे निवडणूकीचा ज्वर महाराष्ट्रात दिवसागणिक वाढू लागलाय… या निवडणूकीच्या सभेवरूनच अमरावतीतील राडा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. आली लहर केला…

जोतिबाच्या नावनं चांगभलं!

कोल्हापूर : जोतिबाच्या नावनं चांगभलंच्या गजराने आज अवघा जोतिबा डोंगर निनादून गेला…दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या तीन दिवसीय चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला…

भर पावसात उद्धव ठाकरेंची सभा

मोदी-शाहांना चॅलेंज, ठाकरेंना संपवून दाखवाच ! परभणी- कोसळणाऱ्या धुवाँधार पावसात उध्दव ठाकरेयांनी किल्ला लढवित परभणीकरांना भावनिक साद घातली. वादळ पावासाला अंगावर घ्यायला सुध्दा मर्दाची छाती लागते ती माझ्या शिवसैनिकांकडे आहे.…

अकोल्यात अमित शहांनी दिला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गीतातून जय भवानी शब्द हटवण्याची नोटीस बजावली असतानाच आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी जय भवानी, जय शिवाजीचा…

मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल

लोकसभा निवडणूक 2024  जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती मुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने…

मुंबई उपनगर जिल्हा: मीडिया सेल मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली.

निवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर

 साडेपाचशेहून अधिक पथकांचे 24×7 काम सुरु जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती मुंबई  : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी…

मीडिया सेल सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्चपासून ते आतापर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी-व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून 135 तक्रारींचे निवारण केले. उर्वरित 183 तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र काढावे आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचे स्वरूप अंधेरी पूर्व-16, अंधेरी पश्चिम-8, अणूशक्तीनगर-7, भांडूप पश्चिम-5, बोरीवली-13, चांदिवली-26, चारकोप-14, चेंबुर-14, दहिसर-8, दिंडोशी-5, घाटकोपर पूर्व-3, घाटकोपर पश्चिम-2, गोरेगाव-10, जोगेश्वरी पूर्व-5, कलिना-8, कांदिवली पूर्व-8, कुर्ला-5, मागठाणे-24, मालाड पश्चिम -11, मानखुर्द शिवाजीनगर-1, मुलुंड -16, वांद्रे पूर्व-7, वांद्रे पश्चिम-8, वर्सोवा-3, विक्रोळी-16, विलेपार्ले-5 अशा एकुण 245 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.