Month: April 2024

हातरिक्षा चालकांच्या हाती येणार ई-रिक्षाचे स्टीयरिंग

माथेरान : मागील एका तपापासून पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू होऊन सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी गावातील त्याचप्रमाणे अन्य मंडळींच्या विरोधाचा सामना करत अनेकांच्या कडव्या संघर्षाला सामोरे जात आपला लढा कायम ठेवून अखेरीस आपली ई- रिक्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे हातरीक्षा चालकांनी समाधान व्यक्त करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. सुप्रीम कोर्टाने वीस ई- रिक्षांना परवानगी दिली असून यापुढे हातरिक्षा चालकांच्या हाती लवकरच ई-रिक्षाचे स्टीयरिंग येणार असून या कष्टकरी श्रमिकांच्या संघर्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश असल्याचे ई-रिक्षा प्रेमी बोलत आहेत. सुप्रीम कोर्टांने दि 10 जानेवारीला ई- रिक्षा हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात असा महत्वपूर्ण निर्णय दिला होता.त्याचवेळी सनियंत्रण समितीला ई रिक्षाची संख्या निश्चित करणे व ई-रिक्षाची मार्गिका ठरविण्यास सांगितले होते त्यानुसार सनियंत्रण समितीने 6 मार्चला झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात 20 ई-रिक्षांची परवानगी दिली व अहवाल कोर्टाला सादर केला मात्र सनियंत्रण समितीच्या मिनिट्स मध्ये 20 ई रिक्षांचे वर्गीकरण 15 विद्यार्थ्यांना व 5 स्थानिकांना असे करून प्रामुख्याने या ई-रिक्षाच्या सेवेत पर्यटकांचा उल्लेख न केल्याने तर्क वितर्क सुरू झाले होते श्रमिक रिक्षा संघटनेचे वकील ऍड ललित मोहन यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना देखिल देण्याची मागणी केली पर्यटन हाच येथील प्रमुख उद्योग असून दरवर्षी दहा लाख पर्यटक माथेरानला भेट देतात कायद्यात समानता आहे वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोणत्याही समूहाला डावलता येत नाही तसेच वीस हात रिक्षा चालकांनी ई रिक्षा खरेदी केल्या असून पर्यटकांना सेवा दिली तरच त्यांना उत्पन्न मिळू शकते ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. न्या बी आर गवई व न्या संदीप मेहता यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना दिली जाईल असा स्पष्ट आदेश दिला आहे तसेच जे परवानाधारक हातरिक्षा चालक आहेत यांनाच परवानगी द्यावी या चालकांचा  सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत कोर्टाला सादर करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच हात रिक्षा चालकांच्या ई रिक्षा माथेरानच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.  कोर्टामध्ये ऍड ललित मोहन सोबत ऍड विधे वैश्य व ऍड आकांक्षा यांनी युक्तिवाद केला तर अश्वपाल संघटनेसाठी श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला होता. पहिल्या टप्यात वीस ई रिक्षांना मिळालेली परवानगी ही हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तीची सुरवात आहे व लवकरच उर्वरित  74 हात रिक्षा चालकांना देखील ई रिक्षाची…

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सन्मान

ठाणे:ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, दैनिक पुढारीचे ठाण्याचे ब्युरो चीफ दिलीप शिंदे, जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी ,छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस आदीं उपस्थित होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या  ३० मार्चला आयोजित पत्रकार मेळाव्याचे  ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे प्रमुख पाहुणे होते. मात्र अचानक केंद्रिय निवडणूक आयोगाच्या महत्वाच्या कामासाठी त्यांना  कल्याणला जायचे होते.  ते  सकाळी १०.३० वाजता पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले, मात्र त्यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार  ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या नियोजित सर्वसाधारण सभा सुरू होती. सभेनंतर पत्रकार मेळावा असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर  जिल्हाधिकारी  शुभेच्छा संदेश देऊन  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामासाठी कल्याणला गेले होते.  त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काल त्यांची भेट घेऊन त्यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

कोपरी गावात हनुमान जयंती उत्साहात साजरी

ठाणे :कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यावर विविध थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी गाव येथे जुने अंजनी पुत्र हनुमान मंदिर असून, वर्षभर अंजनी पुत्र हनुमान सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरात  मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी करण्यात आले. सोबतच एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन देखील माजी नगरसेविका मालती पाटील अणि रमाकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते.  या आरोग्य शिबिरात रुग्णांना कोणत्या व्याधीची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले होते. पेसमेकर, एनजिओग्राफी, केमोथेरेपी अशा महागडे उपचार यामध्ये समाविष्ट होते.

महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली

रमेश औताडे मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान…

भाजपाच्या गुंडांवर कारवाई करा – प्रा. वर्षाताई गायकवाड

रमेश औताडे मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघाचे भाजपा उमेदवार पियुष गोयल यांनी आगरी, कोळी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिनांक २१ एप्रिल रोजी मुंबई शहर व उपनगरात गोयल यांच्याविरोधात आंदोलन…

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झालेल्या 135 तक्रारींचा निवडणूक आयोगाकडून निपटारा

रमेश औताडे मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने सी विजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू…

पात्र अजूनही भरतेच आहे

शुभेच्छा प्रसाद आठल्ये पार्ल्यातील हनुमान मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव लोकसेवा मंडळ या सुपरिचित संस्थेने मिलिंद रघुनाथ पूर्णपात्रे या बॅडमिंगटनपटुना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे त्याबद्दल सर्व प्रथम त्यांचं मनापासून…

माणसे वाचणारा अजरामर माणूस

दिन विशेष उर्मिला राजोपाध्ये २३ एप्रिल हा विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिनही आणि मृत्यूदिनही. मात्र काहीजण मृत्यूनंतरही कामाच्या, लौकिकाच्या रुपाने जगतात. अशाच काही मोजक्या नावांमध्ये शेक्सपियर या महान नाटककाराचा समावेश होतो.…