Month: April 2024

महायुतीत जागावाटपाचा संस्पेस कायम

मुंबई :  मुंबई, ठाण्यात आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वाजतगाजत उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असताना त्याच जागावर महायुतीतमात्र सन्नाटा आहे. नक्की जागा कोण लढविणार याबाबतच अजून संस्पेस कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या…

निजामने केली पुनमची निघृण हत्या!

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! मुंबई,  : मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम…

मतदारांच्या जनजागृतीसाठी 5 मे रोजी मॅरेथॉनचे आयोजन

पालघर  : 5 मे रोजी सकाळी 6 वाजता विविध वयोगटातील नागरिकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉनचे आयोजन SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत करण्यात आले आहे. भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters…

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट संचलन पुरस्कार भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

लोकलमधून पडून डोंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू

डोंबिवली: छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्याने डब्यात शिरता न आल्याने लोकलच्या दरवाजात दाटीवाटीने उभे राहून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा, एका तरूणीचा दोन दिवसांत लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत. लोकलची संख्या वाढवुनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकल मधून पडून जखमी झाले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नाही. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतल्याने कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली. ती ठाण्यातील एका बांंधकाम कंपनीत कामाला होती. डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या खाडीत पडून मृत्यू झाला आहे. तो लोकलने मुंबईच्या दिशेेने प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. मुंब्रा खाडीजवळ लोकलच्या दरवाजाला त्याने धरलेला हात सटकला तो खाडीत पडला असे पोलिसांंचे म्हणणे आहे. अवधेशची कार्यालयीन पिशवी गायब असल्याचे कुटु्ंबीयांनी सांगितले. यामध्ये काही घातपात असण्याचा संंशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. जाणकारांंकडून मिळालेली माहिती अशी की, कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल वेगात असताना रुळांवरून डबे दोन्ही बाजुला वेगाने कलताना दिसतात. यावेळी दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशावर आतील गर्दीचा भार येतो. किंवा त्या प्रवाशाला दरवाजाच्या दांडीला हात धरून उभे राहणे मुश्किल होते. यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडतो. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

‘जेल का जवाब वोट से’

महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी मुंबई : आम आदमी पक्षाचे प्रमुख (आप) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातला संताप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमटत आहे. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या शक्तिप्रदर्शनामध्ये ‘आप’चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सामील झाले होते. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा व ‘जेल का जवाब वोट से’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात असल्यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे, परंतु ‘आप’च्या कार्यकर्त्यांची गळ्यात पक्षाचा शेला, डोक्यावर टोपी व हाती झेंडे घेत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले ‘जेल का जवाब वोट से’ अशा आशयाच्या फलकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जेल का जवाब वोट से, अरविंद केजरीवाल जिंदाबाद, भारत माता की जय, पहले लढे थे गोरो से – अब लडेंगे चोरोसे, गली गली में शोर है भाजपा सरकार चोर है आदी घोषणा करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील फोर्ट परिसर दणाणून सोडला. ‘आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून ऐन निवडणुकीच्या काळात तुरुंगात टाकले आहे. या हुकूमशाही वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला जो धक्का दिला आहे, त्याचे उत्तर आम्ही मतदानातून देणार आहोत. त्यामुळे ‘जेल का जवाब वोट से’ ही आमची नवीन घोषणा आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही जागोजागी ही घोषणा व प्रचार करीत आहोत. सध्या मोदी सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, त्यामुळे बहुसंख्य मतदार हे महाविकास आघाडी – इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करतील’, असे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी बोलताना सांगितले.

कपिल पाटील व श्रीकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे नरेंद्र मोदी रणशिंग फुंकणार

राजीव चंदने मुरबाड : येत्या 10मे रोजी  कल्याण मध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन्ही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. त्याचप्रमाणे आता येत्या १० मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जाहीर सभा घेणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. तर नरेंद्र मोदी यांची सभा होण्याआधीचे भिवंडी आणि कल्याण लोकसभेचे चित्र अतिशय पोषक आहे. पण नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथल्या झंजावाताचे महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल अशा प्रकारचा विश्वासही भिंवडी लोकसभेच्या कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मोदींचे विचार स्वयंस्फूर्तीने ऐकण्यासाठी जनता येत असते, अशाप्रकारे जनता हे विचार ऐकते आणि त्यांनाही मोदींच्या विचारांची प्रेरणा मिळते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित रहा असे आव्हान भिवंडी लोक सभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले आहे

ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ

जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्याने ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली. तसेच ठाण्यात मिंधेची उमेदवारी  गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठरणार असल्याची खरमरीत टीका करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार गॅंगवर जोरदार निशाणा साधला. इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी शिवसेना, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण, शिवसेना उपनेते विजय कदम, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद, कॉंग्रेस उपाध्यक्ष राखी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सलुजा सुतार, कॉंग्रेस महिला आघाडी पूनम पाटील, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, अनिश गाढवे, मुजफ्फर हुसैन, धर्मराज्य पक्ष अध्यक्ष राजन राजे, व इंडिया-महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिल्डरने लावला घर खरेदीदारांना चुना, घरखरेदीदार रस्त्यावर

केतन खेडेकर मुंबई : सुप्रिम सिव्हील कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा.लि. या कंपनीचे डायरेक्टर अब्बास कुरेशी यांनी त्यांच्या  कंपनीच्या माध्यमातून चेंबूर येथे इमारतीचे बांधकाम करण्याचे काम घेतले. त्यानंतर त्यांनी एका व्यावसायिक ओळखीतून  कुर्ला (पूर्व) येथील वत्सलाताईनगर, नेहरूनगर मधील, ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) कंपनीच्या ‘मास मेट्रोपोलिसीस या प्रकल्पाचे काम मिळाले. ह्या कामाची पाहणी करण्याकरिता व प्राथमिक बोलणी करण्याकरिता  तसेच आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. निकेश इंदरलाल रावल गेलो असता. या मास मेट्रोपॉलिसीस साईट साठी ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या कंपनीस बार्टर सिस्टम (पैशाच्या बदल्यात फ्लॅट अथवा बांधकाम एरिया देणे) नुसार काम द्यायचे ठरले. त्यानुसार ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ चे मालक अत्ताउल्ला अन्सारी, दानिश अन्सारी, निशांत अन्सारी यांच्या विरोधात मी दिनांक २६/०७/२०२२ रोजी गुन्हेगारी, कट, फसवणूक, विश्वासभंग आणि धमकी देत असल्याच्या गुन्ह्याबद्दल मा. पोलिस सहआयुक्त (गुन्हे) यांचे कडे तक्रार केली होती. आमच्या सोबत खरेदीदारांची ही फसवणूक केली आहे. ११ फ्लॅट पैकी ०२ फ्लॅट चे रजिस्ट्रेशन करून दिले आणि उर्वरित ०९ फ्लॅट च्या ‘अलॉटमेंट लेटर’ आणि ‘डीड ऑफ कॅन्शलेशन’ यामध्ये फ्लॅट एरिया, फ्लॅट नंबर यांमध्ये तफावत आहे. तसेच अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर फ्लॅट हे दुसऱ्याच व्यक्तीना रजिस्ट्रेशन करून विक्री केले. त्यानुसार सतत 2 वर्षांपासून आम्ही आमची तक्रार गुन्हे शाखेने नोंदवली नाही, आरोपीच्या चुकीच्या तक्रारीवर आमचा धक्का आणि आश्चर्य व्यक्त करत संयुक्त सीपी गुन्ह्याने प्रकरण 6 वरून युनिट 7 कडे वर्ग केले. तसेच घर खरेदीदार यांनी रिट याचिका क्र. 4218आणि अशोका बिल्डकॉन यांनी अनेक रिट याचिका क्र. 5779 ऑफ 2024 आणि आम्ही रिट याचिका क्र. 4691ऑफ 2024 केल्यानंतरच पोलिसांनी आमची प्रकरणे घेतली आणि एफआयआर नोंदविला गेला नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, या सर्व विकासानंतरही आणि माननीय उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार आरोपींना अटक केली जात नाही आणि कायद्याची भीती न बाळगता आरोपी मुक्तपणे फिरत आहे. एकूण रु. 12 करोडची आमची फसवणूक करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत किंवा कोणतीही कारवाई करत नाहीत. एक आरोपी केवळ श्रीमंत आणि उच्च संपर्कातील लोक असल्यामुळे आमचे संरक्षण कसे होते, या प्रकरणात निष्पक्षता का नाही, पोलिसांच्या या दृष्टिकोनाने आम्ही हैराण झालेल्या सर्व उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊन देखील आम्हाला कोणतेही यश मिळालेले नाही किंबहुना आमची रक्कम किंवा घर देखील आम्हाला परत मिळालेले नाहीत. तरी आम्ही संपूर्णपणे हवालदिलं झाले असून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रसारमाध्यमांना आवाहन करत आहोत की आम्हाला आमचे हक्काचे घर मिळवून द्यावे अशी माहिती बांधकाम व्यवसायिक निकेश रावल आणि अब्बास कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन  दिली.

‘दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याचा गप्पा सांगू नका’

थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला जरंडीतील महायुतीच्या प्रचार सभेतील प्रकार छायाचित्र ओळ-जरंडी येथील महायुतीच्या सभेत मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार दुसऱ्या छायाचित्रात उमेदवार रावसाहेब दानवे मार्गदर्शन करताना तिसऱ्या छायाचित्रात जनसमुदाय…. सोयगाव : अहो साहेब! दोन वर्षांपासून आमचा शेतकऱ्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही आमचे रेशनचे धान्य बंद केले आहे आम्हाला त्या अंशी कोटी लोकांच्या गप्पा नका सांगू आमचे धान्य का बंद आहे याबाबत तालुका प्रशासन दरबारी ओरड मांडा असा भर सभेत लाभार्थ्यांनी जाब विचारुन सभेत मार्गदर्शन करतांना खासदार रावसाहेब दानवे यांना दोन मिनिटे भर सभेत स्तब्ध केल्याचा प्रकार सोमवारी राज्य आणि केंद्राच्या दोन मंत्र्यांच्या सभेत जरंडी (ता सोयगाव) येथे घडला दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ग्रामस्थांची समजूत काढून आधी ऐकून तर घ्या ऐकल्याशिवाय कसे समजेल असे प्रत्युत्तर देऊन वेळ मारून नेली आहे … जालना लोकसभाचे महायुतीचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मतदार संघाचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या जरंडीतून सुरुवात करण्यात आली होती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला २०२२ पर्यंत मोफत रेशनचे गहू व तांदूळ दिल्या चा मुद्दा काढताच साहेब आम्हाला दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा आमच्याकडे तीन एकर शेती आहे काय खावे दुष्काळात धान्य मिळत नाही असा जाब थेट सभेत दोन्ही मंत्र्यांना विचारला त्यावेळी मंत्री सत्तार स्तब्ध झाले तर दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण पुढे सुरू ठेवत आधी ऐकून घ्या त्याशिवाय समजणार नाही असे बोलून वेळ काढून घेतली होती यावेळी व्यासपीठावर   भाजपचे जेष्ठनेते सुरेश बनकर,अल्पसंख्याक चे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी,बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाबाई काळे, भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड,  भाजपचे  जयप्रकाश चव्हाण,आदींची उपस्थिती होती काय म्हणाले शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे— महायुतीच्या बाबतीत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितले की राज्यात युती असली तरीही सिल्लोड सोयगाव तालुक्यात भाजपा युती धर्म पाळत नाही त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सोयगाव तालुक्यात भाजपा सोबत काम करण्याची मानसिकता नाही मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाचा सन्मान करत आम्ही काम करत आहे भाजपने सुधारणा करावी मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव ची भाजपा युतीच्या विरोधात होती हे सर्वश्रुत आहे असे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितल्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर खुलासा करत रावसाहेब दानवे यांच्या सोबत या मुद्द्यावर सात बैठका झाल्या आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलली आहे असे सांगून चार महिन्यात भाजपा काय आहे हे कळेलच असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी यावर पोतारा फिरवीत अब्दुल सत्तार आणि मी चाळीस वर्षांपासून दोस्त आहे आम्ही भांडतो व एकही होतो राजकारनात कोणीही कोणाचा मित्र व शत्रू नसतो त्यामुळे आता आमचं जमलं तुमचं जमलं पाहिजे तुम्ही जमवून च्या घ्या असा सूचक टोला रावसाहेब दानवे यांनी भाजपा च्या कार्यकर्त्यांना मारला यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनीही पुन्हा रेल्वे मंजुरीचा विषय काढत जालना वरून पुढील निवडणूकीत रावसाहेब दानवे यांना थेट रेल्वेने फर्दापुरला निवडणुकीच्या प्रचाराला बोलावू असा खोचक शब्दात सूचक वक्तव्य केले त्यामुळे जरंडीतील प्रचार सभेतही या दोघांच्या मध्ये राजकिय कलगीतुरा रंगला होता… यावेळी अनुसूचित जातीचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजीवन सोनवने,राजेंद्र पाटील,सरपंच स्वाती पाटील,वंदनताई पाटील,धृपाताबाई सोनवणे, शमा तडवी, श्रीराम चौधरी, समाधान तायडे,आदींसह तालुक्यातील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपसरपंच संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले पुष्पा बाई काळे यांनी आभार मानले.