Month: April 2024

३० एप्रिलपर्यंत मतदार जाणीव जागृती कृती आराखडा – महेंद्र गायकवाड

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीतील प्रबोधनासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनानुसार मतदार जाणीव जागृती कृती आराखडा आखण्यात आला असून १ एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्याची माहिती ठाणे झजिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी  दिली आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचा मतदार जाणीव जागृती कृती आराखडा १ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड,  शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर या तालुक्यांमधील कौटुंबिक हिंसाचारांतर्गत नोंदणीकृत असलेल्या १५००. महिलांना व बालसंगोपन, शिलाई मशीन, स्वयंरोजगार, विद्यावेतन या ३६०० लाभार्थीं महिलांना आणि महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित ४५०० बचतगटातील महिला प्रमुखांना, मतदान ओळखपत्र नसल्यास उपलब्ध करुन देणे, मतदान करणेविषयी जाणीव जागृती करणे, १८ वर्षापेक्षा अधिक असलेल्या मुलींना नमुना ६ भरणे याबाबत सूचित करणे. १० एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत वरील १२, ००० महिलांना फोन, एसएमएसद्वारे मतदान विषयी जाणीव जागृती करणे व माहिती पुरविणे. २० एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत ४२०० अंगणवाडी सेविका, ४२०० मदतनीस, १०० मुख्यसेविका यांच्याद्वारे पथनाट्य,  प्रभातफेरी, प्रदर्शन, स्पर्धा या माध्यमातून मतदान विषयी जाणीव जागृती करणे व माहिती पुरविणे. जाणीव जागृतीसाठी फेसबुक, युट्यूब, मेसेज, काॅल, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हिडीओ काॅल, बॅनर, मोखिक आदी संपर्क साधनांचा उपयोग करणे. तसेच भारतीय घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्याचा आणि देशासाठी काम करणाऱ्या योग्य उमेदवार निवडण्यासाठी निर्भयपणे, निष्पक्षपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करेन अशा अर्थाचा संकल्प या जाणीव जागृती उपक्रमांतर्गत करण्यात येणार असल्याचेही ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

सिद्धेश्वर तलाव येथे श्री समर्थ मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर व अमृतमुल्य किर्तन सोहळा संपन्न

ठाणेः ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात कार्यरत असलेल्या श्री समर्थ मित्र मंडळ या सेवाभावी संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त रक्तदान शिबीर व अमृतमुल्य किर्तन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रक्तदान शिबिरात सुमारे 232 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर यावेळी आयोजित आरोग्य शिबिरातही ईसीजी, मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष निलेश मुंढे, सरचिटणीस गणेश हळदे, खजिनदार नारायण काते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यास भाजिवाली चाळ, पाटीलवाडी रोड, सिद्धेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी अजितभाई शहा, संतोष अबगुल, नारायण पवार, रुचिता मोरे, प्रल्हाद पाटील सचिनदादा भोसले आदींची विशेष उपस्थिती लाभली. रविवारी सिद्धेश्वर तलाव परिसरात श्री समर्थ मित्र मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी संतोष अबगुल प्रतिष्ठान व श्रीमती शारदाबाई हौशिलाल मेडीकल फाउंडेशन ट्रस्ट व वेद हॉस्पिटल यांच्यावतीने रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर संपन्न झाले. यावेळी 232 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला. सायंकाळी 7 वाजता हरिपाठ व रात्रौ अमृतमुल्य किर्तन सोहळयामध्ये खेड तालुक्यातील कळंबणी गावचे ह.भ.प. गणेश महाराज शिगवण यांच्या सुमधूर किर्तनाचा आस्वाद भाविकांनी घेतला. या कार्यक्रमासाठी सल्लागार सुनिल चव्हाण, अनंत शिंदे, सुरेश तटकरे, यशवंत जवरत, संजय गायकवाड, एकनाथ तेली, रिंकेश जाधव, चंद्रकांत कासार, गजानन साळसकर, विशाल फाटे, अंकुश हिरवाडकर, नितीन खामकर, नरेंद्र महाबळे, महेंद्र ठाकूर, दिनेश हळदे, संतोष दंत, हर्षद उतेकर, सुभाष बारस्कर,  स्वप्नील कालेकर, अमित दिगे, मधुकर साळुंखे, सुरेश ऐत, निळकंठ काते, भावेश चव्हाण, संदेश जवरत, केवळ चव्हाण, प्रशांत खरीवले, साहिल गायकवाड, मंगेश मुंडे, सौरभ शिंदे, रोहित हळदे, संस्कार तटकरे, सर्वेश गायकवाड, रविंद्र घाडगे, रुपेश पवार, विष्णु पांचाळ, महेश मोरे, मयुर कदम, सुचित चव्हाण, आत्माराम गंगुत्रे, कल्पेश चव्हाण, रोहिदास लोखरे, नामदेव निपुत्रे, बापु पाटील, अशु ठाकूर आदी कार्यकर्ते व हितचिंतकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

शिवसेना उबाठा गटाच्या रागिणी बैरीशेट्टी यांचे प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अर्ज बाण !

अनिल ठाणेकर ठाणे : शिवाईनगर परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या स्थानिक माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचे) आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या समाज मंदिर कामांविरोधात ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज बाण सोडलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महापालिका स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर प्रभाग क्रमांक ५ मधील गणेश नगर येथील म्हाडाच्या लेआऊट मधील मोकळ्या जागेवर शिवसेना (शिंदे गटाचे) स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या समाज मंदिर हाॅलचा वापर गत चार वर्षांपासून सुरु असून सदर मिळकत ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थावर मालमत्ता विभागाकडे हस्तांतरीत केल्याबद्दलची सर्व कागदपत्रे स्थानिक रहिवाशांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत. ठाणे महापालिका सचिव यांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४७ येथील खेळाच्या मैदानावर बांधण्यात आलेल्या समाज मंदिर हाॅलच्या नामांकरण ठरावाची प्रत मिळावी तसेच वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर परिसरातील सेप्टीक टाकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या समाज मंदिराच्या कामाची माहिती देण्यात यावी, अशा मागणीचे लेखी अर्ज महापालिका प्रशासनाकडे करुन शिवसेना (शिंदे गटाचे) स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अर्ज बाण सोडला आहे.

जीवनातील अनमोल नर्मदा प्रदक्षिणा !

मुंबई : नर्मदा परिक्रमा ही देवस्थान तीर्थक्षेत्र पेक्षाही श्रेष्ठ आहे. अनमोल अशी नर्मदा परिक्रमा जीवनात एकदा नाही तर पुन्हा पुन्हा करावी असे आवाहन ‘रामकृष्ण विनामूल्य वाचनालयाच्या ग्रंथपाल व साहित्य संपादिका,तसेच अखिल सक्षम महिला मंच समुपदेशक नंदिनी मनोहर सोनवणे यांनी केले. जीवनातील अनमोल नर्मदा प्रदक्षिणा इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदोबा गावातील श्री व सौ.नंदिनी मनोहर सोनवणे यांनी स्व: वाहनाने 16 दिवसांची नर्मदा परिक्रमा केली. त्या निमित्ताने बोलताना त्यांनी परिक्रमाविषयी आपले काही अनुभव सांगितले. ९ जानेवारी रोजी नर्मदा परिक्रमाला आरंभ केला. प्रथम ओंकारेश्वर दक्षिण तटावर संकल्प पूर्ती करून रेवा संगम ते अमरकंटक हा दक्षिण तटाचा प्रवास पूर्ण झाला. उत्तर तटाचा प्रवास अमरकंट ते ओंकारेश्वर हा प्रवास पूर्ण झाला. हे संपूर्ण अंतर ४२०० किलोमीटर प्रवास आहे. दक्षिण तटावरील प्रवास करताना जागोजागी अन्नकुठाची व्यवस्था व ऋषीमुनी व सेवाभावी का या परिक्रमावासहित भेटत होत्या. परिक्रमा करताना दुसरे सहचारी क्रमा करणारे चांदवड देवीच्या येथे राहणारे सौ मंदा अशोक महाले यांची योगायोगाने भेट झाली. हा योगायोग परतीच्या प्रवासात चांदवड देवीचे दर्शन घेतले. मार्कंड ऋषी यांनी प्रथम नर्मदा परिक्रमा केल्याचे शास्त्र पुराण सांगते. परिक्रमा करताना मार्कंड ऋषींच्या आश्रमात गेलं असता गुरु मिळाल्याचा आनंद झाला. 22 जानेवारीला रोजी आयोध्या मध्ये राम लल्ला यांच्या स्थापनेचा दिवस व त्याच दिवशी आम्ही अमरकंटक पोहोचलो. अमरकंटक मध्ये नर्मदा मातेचे उगम स्थान आहे. राम लल्लनच्या स्थापने च्या रथयात्रेत कलश घेऊन त्या रथयात्रेत सामील झाले. धारवड असं क्षेत्र आहे की महा नर्मदेच्या पात्रातून स्वयंभू बाणलिंग मिळतात. आम्हाला असंख्य लहान ते महान शिवलिंग बघण्यास मिळाले. नंदिनी सोनवणे बोलताना म्हणाल्या की, प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी शिव मंदिर व त्यातील स्वयंभू साक्षात्कार मिळत गेला हा महिमा शिवकृपेचा रूपाने साकारत गेला. प्रत्येक क्षणी नर्मदा तीरावरून जात असताना जशी महा नर्मदा हातात वीणा घेऊन झंकारित केल्याचा आवाज येत होता 16 दिवसांत मा नर्मदा स्तोत्र आरती व हर हर नर्मदे घोष अजूनही मनात कोरले गेले आहे हर हर नर्मदे.. नंदिनीताई यांनी आपले काही काही अनुभव आम्हास सांगितले. ओंकारेश्वर मध्ये प्रथम गजानन महाराजांच्या आश्रम मुक्काम व तोच परतीच्या प्रवासामध्ये मुक्काम तेथेच घडला.

ई -रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात क्रांती घडणार का?

माथेरान : माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर दळणवळणाचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे या ई रिक्षांमुळे हात रिक्षा या कालबाह्य होणार असून हात रिक्षा ओडणाऱ्यांना एक सन्मानजनक व्यवसाय मिळणार…

शहापूर तालुक्यातील एक ही ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यावाचून राहू नये- अशोक शिनगारे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई बाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत शहापूर पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी 31 मार्च 2024 पर्यंत टँकर ग्रस्त असलेल्या एकूण ९१ गाव पाड्याची माहिती घेतली. पुढील महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा असे सांगितले. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना सांगितले. शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे.‌ कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी भिवंडी अमित सानप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूर विकास जाधव, स्वच्छ भारत मिशन पंडित राठोड, तसेच पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता शहापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अमेरिकेत पूल कोसळला; भारतासह जगाच्या व्यापाराला फटका

अमेरिकेतील बाल्टिमोरच्या की ब्रिज परिसरात कंटेनर जहाजाची टक्कर झाल्यानंतर पूल पत्त्याच्या डेकसारखा कोसळला. पूल कोसळल्याचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक मोठे कंटेनर जहाज पुलाच्या खांबाला आदळताना…

आणखी एक गोंधळलेला रविवार!!

ऐन युद्धाची सुरुवात होत असताना महापराक्रमी, महावीर अर्जुन त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य खाली टाकून श्री कृष्णापुढे उभा राहिला आणि म्हणाला की, “हे जगन्नियंत्या, मला जिकडे तिकडे माझी भावंडे, काका मामा…

एप्रिल फुल

विशेष श्याम ठाणेदार आज १ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण दिवस जगात एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. फुल ( fool ) म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. आपणही…

‘फूल’बागेतला एक उनाड दिवस

प्रासंगिक स्वाती पेशवे जगण्यातील ताणतणाव ही काही आजची गोष्ट नाही. तणावांमागील कारणे वेगळी असली तरी त्याने कधीच माणसाची साथ सोडलेली नाही, हेही खरेच. त्याच्या प्रभावाखाली जगणारा समाज कधी कधी निखळ…