कोकणात मानापमान सुरु…
रत्नागिरी : लोकसभेच्या निवडणूकीच्या कोकणात एकीकडे धुळवड सुरु असतानाच दुसरीकडे मानापमानाचे नाट्यही रंगले आहे. लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याचा वादा पुर्ण न करु शकणाऱ्या उदय सामंत यांचे पोस्टर त्यांचाच भाऊ किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावरुन काढून टाकलेत. यापुढे उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची भूमिका किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यामुळे कोकणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.
किरण सामंतांच्या कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर नेमके का हटवण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान किरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रत्नागिरी शहरातील प्रसार माध्यमांच्या ग्रुपवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. किरण सामंत यांनी यावर मौन बाळगल्याने संस्पेंस अजुन वाढला आहे.