रमेश औताडे
मुंबई : सर्वांनी न चुकता मतदान करा असे आवाहन करत, प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या ” मागे वळून पाहताना ” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी मांडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर भावे यांच्या प्रेमापोटी उपस्थित होते.
लोकमत समूहाचे राजेंद्र दर्डा व विजय दर्डा , मा.खा. रामशेठ ठाकूर, आचार्य अत्रे यांचे नातू राजेंद्र प्रसाद पै, मंगल गाणी फेम अशोक हंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बाभळे, विश्वात राही भिडे, कार्यवाह संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले की, भावे यांच्या आईने भावे मुंबईला नोकरीसाठी निघाले असताना दिलेल्या कंदिलाच्या प्रकाश भावे यांनी ६५ वर्ष पत्रकारिता केली हि खूप मोठी गोष्ट आहे. आचार्य अत्रे यांच्या सावलीत मधुकर भावे यांची वाढ झाली. ६५ वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रात काय परिस्थिती होती याची सर्व माहिती या पुस्तकात आहे. संस्कार बाजारात विकत मिळत नाहीत भावे यांच्या न शिकलेल्या आईने त्यांच्यावर संस्कार केले. समाजाबरोबर जो चालतो तो खरा पत्रकार असतो. भावे यांनी समजाबरोबर चालत पत्रकारिता केली.असे कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
मधुकर भावे यांच्या आठवणींचा किस्सा सांगत पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बाभळे यांनी चारोळ्या ऐकवल्या व भावे यांचा या वयातही कार्यरत आहेत याबाबत यांचे कौतुक केले.त्याचा १०० वा वाढदिवस याच सभागृहात आपण साजरा करूया असे ते म्हणाले.
मधुकर भावे यांच्या सोबत आठवणीच्या विश्वात रमले की एकही आठवण रिपीट होत नसते असे संदीप चव्हाण यांनी सांगितले. भावे यांच्या पुस्तकात असे राजकारणी आहेत की तसे राजकारणी पुन्हा होणार नाहीत आणि मधुकर भावे यांच्यासारखे लेखक पुन्हा होणार नाहीत असे संदीप चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले.