ठाणे : कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर या गिर्यारोहन संस्थेने रत्नागिरी येथील समुद्रालगत असलेल्या सुमारे १०० फूट उंच सुया सुळक्यावरून महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्याला वंदन करत अनोखा विक्रम केला. मुख्य बाब म्हणजे सुळका अगदी समुद्रालगत असून कामगिरी करत असताना पाण्याने निसडती झालेली पकड त्यामुळे जोखीम जास्त होती. परंतु अनुभवी संघ आणि योजनाबद्ध कामगिरी असल्याने सदर मोहीम यशस्वी करण्यात आली.

कल्याण येथील सह्याद्री रॉक ऍडवेंचर ही गिर्यारोहन संस्था आहे. या संस्थेतील गिर्यारोहक साहसी कामगिरी करत विक्रम करत असतात. या संस्थेने पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्ताने रत्नागिरी येथील सुया सुळका ज्याची उंची सुमारे १०० फूट आहे असा सुळका सर करत राज्याला वंदन दिली. या कामगिरीची मुख्य बाब म्हणजे सुळका अगदी समुद्रालगतच आहे. त्यामुळे कामगिरी करत असताना पाण्याने निसडती झालेली पकड त्यामुळे जोखीम जास्त होती. अनुभवी संघ आणि योजनाबद्ध कामगिरी असल्याने मोहीम यशस्वी करण्यात आली. ही कामगिरी यशस्वी करण्यात संघाचे दर्शन देशमुख, भूषण पवार, संजय करे, सूचित लाड, सुहास जाधव, स्वप्नील भोईर, स्मितेश येवले, अभिजित कळंबे, अभिषेक गोरे, प्रशिल अंबाडे आणि अंकिता पटलेकर हे उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *