मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी झाली निवड

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली.

निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,  29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051. त्यांचा संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक (+)९१ ८९२८५७१२५३ असा आहे.

दरम्यान, निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मुळे यांच्यासह पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च पथक प्रमुख  आदी उपस्थित होते.  या बैठकीत निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी नामनिर्देशन व्यवस्था, ETPBMS वेळापत्रक, घरपोच मतदान, पोस्टल बॅलेट मतदान, मतदानाच्या तयारी आदी बाबतचा आढावा घेतला. खर्चाच्या दृष्टिकोनातून आदर्श आचारसंहिता आणि संवेदनशील भागात सतर्कता बाळगावी, अशा सूचना देत त्यांनी मुक्त आणि नि:पक्ष मतदान घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. थिंड माध्यम कक्षाचे कामकाज, दैनंदिन पाठविले जाणारे अहवाल, समाजमाध्यम, वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांचे सनियंत्रण कशा प्रकारे केले जात आहे, याची माहिती घेतली. सध्या वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा समाजमाध्यमांचा अधिकाधिक प्रचार उमेदवार करताना दिसतात. त्यामुळे या माध्यमाद्वारे उमेदवारांच्या प्रचाराकडे आणि त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या भेटीत श्री. थिंड यांनी माध्यम कक्षांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *