नितीन दूधसागर
ठाणे : कुठे पोकळ आश्वासनांची खैरात , तर कुठे जातीय वादाची किनार घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसविण्यासाठी “रिपब्लिकन बहुजन सेना” ने आपला उमेदवार श्री विजय ज्ञानोबा घाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
२५ ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये मॅडम यांच्याकडे श्री. विजय घाटे यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्त केला आहे.
महा युती आणि महा आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ‘रिपब्लिकन बहुजन सेना’ ने २५ ठाणे लोकसभा मतदार संघात श्री विजय ज्ञानोबा घाटे यांना पक्षाचे तिकीट दिले आहे. गुरुवारी ०२/०५/२०२४ रोजी , विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदार संघात जनतेला बदल हवा आहे , सामाजिक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव विजय घाटे यांना असून , ते या निवडणुकीत नक्कीच करिष्मा करतील , असा विश्वास ‘रिपब्लिकन बहुजन सेना’ च्या कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी ‘रिपब्लिकन बहुजन सेना’चे राष्ट्रीय महासचिव श्री. मुश्ताकजी मलिक , केंद्रीय सल्लागार श्री . नरेशजी भोईर, राष्ट्रीय कोषाध्यक्षा सौ. संजीवनी लोखंडे , राष्ट्रीय प्रवक्ता श्री जगदीशजी सोनटक्के, राष्ट्रीय किसान अध्यक्ष श्री. राज आर्याजी, महाराष्ट्र प्रवक्ते श्री . प्रा. व्यंकटेशजी कांबळे , ठाणे शहर प्रमुख श्री. शिवराज कोटे, माथाडी कामगार अध्यक्ष श्री. शौकत शेख, मजदूर युनियन आघाडी अध्यक्ष श्री. सुनील जैस्वार, महाराष्ट्र संघटक श्री. किशोर लासुरे, महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सौ. शोभा आर्याजी , बिल्डर असो.अध्यक्ष श्री. हिम्मत विसरिया , मीरा-भायंदर अध्यक्ष श्री. अनिश कांबळे, नेहा जाधव, फरीद सय्यद, सज्जादभाई सय्यद, कामगार आघाडी नेते श्री. विनय डोळस ,इत्यादी मान्यवर रॅलीत उपस्थित होते.
