पालघर : २२- पालघर  लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.*

३ मे २०२४ रोजी बळीराम सुकर जाधव (बहुजन विकास आघाडी),यांनी १ अर्ज, परेश सुकर घाटाळ (बहुजन महापार्टी आणि अपक्ष ), यांनी २ अर्ज, हेमंत विष्णू सवरा (भारतीय जनता पक्ष) यांनी ३ अर्ज, कल्पेश बाळू भावर (अपक्ष), यांनी १ अर्ज, राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी), यांनी २ अर्ज, राजेश दत्तू उमतोल (अपक्ष), यांनी १ अर्ज,भरत सामजी वनगा(बहुजन समाज पार्टी), यांनी १ अर्ज,अमर किसन कवळे, (अपक्ष) १ अर्ज, भावना किसन पवार (अपक्ष) १ अर्ज उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत एकूण १७ उमेदवारांनी २६ नामनिर्दशनपत्र दाखल केले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *