नवी मुंबई, :- एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस
पडून असलेल्या मोटार दुचाकी, स्कुटर, ऑटो रिक्षा,फोर व्हिलर या वाहनांच्या मालकी हक्काबाबत एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यांनी दिली आहे.
एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 55 दुचाकी वाहने, 4- चारचाकी
वाहन, 1 थ्री व्हीलर एकूण 60 बेवारस वाहने एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे या वाहनांचे मूळ मालक सदर वाहने घेऊन जाण्यास आलेले नसल्याने एन आर आय सागरी पोलीस ठाण्यामार्फत सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून या बातमी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे आवाहन एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
