ठाणे : शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवल  जात आहे. भिवंडी लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा भिवंडीत सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीमुळे रुपेश म्हात्रे यांना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळेच नाराज असलेले रुपेश म्हात्रे हे आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान रुपेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता आपण  बैठकीत असल्याचे सांगत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *