घरगुती कारखान्यातील श्री गणेश आणि देवीच्या मुर्त्यांचे  नुकसान

ठाणे : धोकादायक इमारत तोडताना बाजूला असेल्या घराचे आणि  घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मुर्त्यांच्या झालेले नुकसान भरून न दिल्यास नाइलाजस्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशी कैफियत गेली काही महिने आपली पत्नी, मुलगी आणि मुलासह उघड्यावर राहणाऱ्या दिव्यातील सरला आई निवास येथे राहणाऱ्या मुर्तिकार विजय कवठकर यांनी मांडली आहे.

विजय कवठकर हे गेली १९ वर्षे दिव्यात राहत असून, गणपती आणि देवींच्या मुर्त्या बनवणे हे त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे, ते राहत असलेल्या बाजूची अनधिकृत कनिष्का इमारत त्या इमारतीतील सदनिकाधारकांनी महापालिकेकडून धोकादायक ठरवली होती.  सदर इमारत पाडताना बाजूला रहात असलेल्या विजय कवठकर यांचे मोठ्या नुकसान झाले आहे.  कनिष्का इमारतीवर कारवाई करताना कवठकर यांच्या घराच्या भिंती तर तुटल्या आहेतच याशिवाय घरत ठेवल्या गणपती आणि देवींच्या मुर्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारवाईनंतर कुवठकर यांचे सगळे कुटूंब उघड्यावर आले असून त्यांची पत्नी आणि मुलीला नैसर्गिक विधी आणि इतर गोष्टीसाठी नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागत आहे. कनिष्का इमारत धोकादायक नसताना त्यातील सदनिकाधारकांनी कुठल्या कारणाने हि इमारत धोकदायक ठरवली असा प्रश्न कुवठकरांनी विचारला आहे. दिव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कनिष्का इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या जागेवर मिळून मोठी इमारत बांधायची आहे. त्या व्यवसायिकाला कुवठकर रहात असलेली जागा हवी आहे.. त्यासंदर्भात कुवठकर आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे एकमत न झाल्यामुळे कनिष्का इमारत पाडताना जाणूनबुजून आपल्या घराचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप कुवठकर यांनी केला आहे. कुवठकर यांनी महापालीका प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली असून न्याय न मिळाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपूर्ण कुटूंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कुवठकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *