ठाणे, दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी यांच्या मातोश्री सौ.सुलोचना महिपत दळवी (वय ७६) यांचे रविवारी, ५ मे २०२४ रोजी दुपारी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
जवारहर बाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. दशक्रिया विधी मंगळवारी, १४ मे रोजी श्री कौपिनेश्वर मंदिर येथे तर उत्तरकार्य शुक्रवारी, १७ मे रोजी २२/००१, कल्पवृक्ष गार्डन, हायलॅण्ड रेसिडेन्सी समोर, ढोकाळी, ठाणे येथे होणार आहे.
