अनिल ठाणेकर
ठाणे : मुरबाड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी, ५ मे ला श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला.
स्थानिक आमदार .किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आणि अविरत प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक,सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संगमेश्वर येथील भगवान शंकर मंदिराचा जिर्णोद्धार आणि मंदिर परीसराचे सुशोभिकरण कामाचे भुमीपुजन काही काळापुर्वी संपन्न झाले होते. मंदिर जिर्णोद्धारावेळी विविध धार्मिक विधी करण्यात येतात,त्यापैकीच एक विधी म्हणजे संकोच विधी होय. सोमवारी, ५ मे २०२४ रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला. याप्रसंगी आमदार किसन कथोरे आवर्जुन उपस्थित राहिले आणि त्यांनी भगवान महादेवांचे मनोभावे दर्शन घेतले.