राजन विचारे यांना मतदारांची साथ

ठाणे : महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला मतदारांनी साथ दिली आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे. अशी साद घालत विचार यांनी आज जोरदार प्रचार केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात केलेली कामे,युद्धपातळीवर सुरू असलेली प्रकल्प त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचा विश्र्वास विचारे यांनी मतदारांना दिला. यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत विचारे यांचे स्वागत केले.
त्यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ता अनिश गाढवे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सह समन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, अरविंद भोईर, साईनाथ पाटील, मयूर पैलकर, प्रतिक राणे, जिवाजी कदम, युवासेना अधिकारी किरण जाधव, राज वर्मा, महिला उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे, सुनंदा देशपांडे, वैशाली शिंदे, युवासेना आरती खळे, पूजा भोसले, विद्या कदम, ज्योती दुग्गल, उषा बोरुडे, गीता चव्हाण, कविता नार्वेकर, कॉंग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी अध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर, महेश म्हात्रे सरचिटणीस कॉंग्रेस, आपचे सलुजा, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून प्रचाराला सुरूवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुम पाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क,आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी,वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा,राबोडी, मीनाताई ठाकरे चौक,गोकुळ नगर गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलवाड, जागमाता मंदिर,कोलबाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका,सिविल हॉस्पिटल,उथळसर, सेंट्रल मैदान पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ,खारकर आळी, सिडको, स्टेडियम ठाणा कॉलेज,खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून प्रचाराची रॅली निघाली.
अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड – विचारे
या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटलेला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. त्यामूळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत. मुळात लोकसभा सारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड करून जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *