नरेश म्हस्के यांना मी जवळून ओळखतो;आयुष्यभर शकुनीमामा

कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा थेट आरोप

ठाणे : नरेश मस्के या व्यक्तीला मी अत्यंत जवळून ओळखतो, आयुष्यभर त्यांनी शकुनीमामाचे काम केले आहे. त्याच भूमिकेत ते राहिले आहेत. शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश म्हस्के आहे. त्यावेळी सतत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात भूमिका म्हक्से घ्यायचा असा थेट आरोप ठाणे कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते.

नरेश म्हस्के हा माझ्या नंतरचा नगरसेवक आहे. धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर यांच्याकडे संपती कशी आली? हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,उध्दव ठाकरे यांच्या जीवनावर यांनी पैसे कमावले आहेत ना, असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला. ज्यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला त्यांना कायमचे तडीपार करा आणि राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला विजयी करा असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *