अदानी-अंबानींवरून राहुलला डीवचले

नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी, सैन्यातील अग्नीवीरांची भरती आणि ‘मोहब्बत की दुकान’ वर जोर देत भाजपाप्रणीत आघाडीला चहोबाजूंनी घेरणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगली टाकला. एरव्ही गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्या नावाने सुटबूट की सरकार अशी टीका राहुल गांधीकडून केली जायची. पण यंदाच्या निवडणूकीत अदाणी आणु अंबानीचा उल्लेखच राहुल गांधी आणि काँग्रेस टाळत असल्यामुळे शेवटी आज नरेंद्र मोदी यांनीच अदाणी- अंबानी यांचा उल्लेख करीत गुगली टाकली.

ऐन निवडणुकीत राहुल गांधी हे अदानी आणि अंबानींवर गप्प का आहेत असा सवाल करत काँग्रेसने अदानी, अंबानींकडून पैसा घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला. तेलंगणातल्या प्रचारसभेत मोदींनी हा आरोप केला. अदानींच्या यशाचं रहस्य काय आणि मोदींचं त्यांच्याशी नेमकं नातं काय असा थेट सवाल राहुल गांधींनी भर संसदेत केला होता.

पण राहुल गांधींच्या यापैकी कोणत्याच आरोपांना मोदींनी कधीच थेट उत्तर दिलं नव्हतं. राहुल गांधींच्या आरोपांनंतरही मोदींनी संसदेत अनेकदा भाषण केलं, पण त्यात अदानींचा साधा उल्लेखदेखील केला नाही.या मुद्द्यांवर आतापर्यंत गप्प असणाऱ्या मोदींनी ऐन निवडणुकीत स्वत:च अदानी, अंबानींचं नाव घेत राहुल गांधींवरच आरोप केलाय. “तुमच्याकडे किती काळा पैसा आहे? टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्यात का? काय डील केलीत? तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणं का बंद केलं. दाल में कुछ काला है… पाच वर्ष आरोप करता आणि आता अचानक ते थांबवता याचाच अर्थ, टेम्पो भरुन तुम्हाला चोरीचा माल सापडला आहे, याचे उत्तर देशाला द्यावंच लागेल.”, असे मोदी म्हणाले.

मोदीजी, अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात का?- राहुल गांधीं

उद्योगपती अदानी आणि अंबानी यांनी काँग्रेसला ट्रकभरून काळा पैसा दिल्या या मोदींच्या खळबळजनक आरोपावर राहुल गांधीनीच मोदींना उलट सवाल करीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. “मोदीजी थोडे घाबरला आहात काय? तुम्ही बंद खोलीत अदानी-अंबानी यांच्याविषयी चर्चा करायचा. पण, आता प्रथमच जाहीर सभेत अदानी-अंबानी या विषयाला हात घातला. ते टेम्पोमध्ये पैसे देतात हे देखील तुम्हाला माहिती आहे. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा सीबीआय आणि ईडीला त्यांच्याकडे पाठवा… सगळी माहिती घ्या. मी पुन्हा एकदा देशाला सांगतो की, जेवढा पैसा मोदींनी अदानी-अंबानी यांना दिला आहे, तितकेच पैसे आम्ही हिंदुस्तानातील गरिबांना देऊ. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *