ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24- कल्याण लोकसभा मतदारसंघातील स्वीप पथकाने 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील विविध चाळी व सोसायट्यांमध्ये मतदान जनजागृती केली व नागरिकांना येत्या 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.
142 कल्याण पूर्व विघानसभा मतदारसंघात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृती पथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखालील पथकाने ही गृहभेटीद्वारे जनजागृती कार्यक्रम पार पाडला.
यावेळी या पथकांनी कैलास नगर, शंकर पावशे रोड, काटेमानेवाली परिसरातील मॉर्डन गृहनिर्माण सोसायटी, ज्ञानदिप गृहनिर्माण सोसायटी, जय अंबे कॉलनी, जय माँ दुर्गा कॉलनी, जय महालक्ष्मी सोसायटी, एल.डी. गायकवाड चाळ, महालक्ष्मी सोसायटी, जय बजरंग चाळ, न्यू अनमोल सोसायटी, मयुर सोसायटी , न्यु शबरी सोसायटी, श्री निवास कॉलनी या ठिकाणी घरोघरी जाऊन मतदान जनजागृतीचा कार्यक्रम करुन मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.
त्याचप्रमाणे या ठिकाणी निवडणुकीविषयी पत्रके वाटण्यात आली. तसेच सदर परिसरातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. या परिसरात लाऊड स्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून त्यांना येत्या 20 मे रोजी मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, भारती डगळे उपस्थित होते.
