अशोक गायकवाड
रायगड : उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि.३१ मे पर्यंत आहे याची उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण नितीन मोहिते यांनी कळविले आहे.
सर्व उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा मानदे कायद्या नुसार त्यांच्या आस्थापनेत उत्पादित/आयात केलेल्या अन्नपदार्थांबाबत वार्षिक परतावा सादर करणे बंधनकारक असून उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि. ३१ मे २०२४ पर्यंत आहे. सर्व उत्पादक व आयातदार पेढयांनी आपला वार्षिक परतावा दि. ३१ मे २०२४ पर्यंत अगोदरच foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करावा. दि. ३१ मे २०२४ नंतर अन्न परतावा दाखल केल्यास प्रती दिन १००/- अशी दंडाची आकारणी करण्यात येते याची उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण नितीन मोहिते यांनी कळविले आहे.
