दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासण्याच्या तारखा जाहीर – सुषमा सातपुते

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण नियमावलीतील भाग बी १ व भारत निवडणूक आयोगाच्या १८ फेब्रुवारी २०१९ च्या पत्रानुसार खर्च निरीक्षकांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब ३ वेळा तपासावयाचा आहे. या तपासण्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून उमेदवार प्रतिनिधींनी वरील तारखांना उपस्थित राहण्याचे आवाहन २४- कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.

खर्च निरीक्षकांनी खर्च तपासण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत –

तपासणीचे ठिकाण : खर्च निरीक्षक यांचे कार्यालय, २४ कल्याण लोकसभा मतदार संघ, क.डों.म.न.पा.जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, पेंढारकर कॉलेज जवळ, घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व, ता.कल्याण, जि. ठाणे -४२१ २०३

खर्च तपासणीच्या तारखा :- ९ मे २०२४, १३ मे २०२४ व .१७ मे २०२४. तपासणीची वेळ :- सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. उमेदवार/प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके/देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना  ई-मेलव्दारेही लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी/ई-मेलने कळविण्यात येईल, असे २४- कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *