पुणे: एन निवडणूकीच्या धामधुमीत शरद पवारांचा बारामतीत पराभव करायचा आहे हे चंद्रकांत पाटील यांचे विधान अनाठायी होती. अशा स्वरुपाच्या विधानाची गरज नव्हती, त्यामुळे बारामतीत नाराजी पसरली अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला काहीही अर्थ नव्हता. वास्तविक सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत असताना शरद पवारांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण नंतर चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांना पुण्यातच राहण्याचा सल्ला आम्ही दिला. बारामतीचा प्रचार आमचे कार्यकर्ते बघून घेतील, असेही त्यांना सांगितले असे अजित पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी ते विधान बोलायलाच नको होते. पण ते का बोलून गेले? हे मला माहीत नाही. चंद्रकांत पाटील जे बोलले, ते चूकच होते. त्यांनी हे बोलायला नको होते. असे अजित पवार म्हणाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटले होते त्यावर आपली प्रतिक्रीया काय यावर याबाबत आपण मोदींशी पुढील दौऱ्यात बोलू ते नक्की कोणासाठी ते बोलले होते याची माहिती घेऊ अशी सावध प्रतिक्रीया अजित पवारांनी दिली.
