ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

ठाणे  : येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात, शनिवार, ११ मे ला सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महापालिकेतर्फे ‘स्वीप’अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रविवारला जोडून मतदानाची सुटी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणे चूकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जात आहे. या मतदानाची आठवण करून देण्यासाठी ‘धावा आणि मतदान करा’ असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवार, ११ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

शनिवारी, स. ६.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोर या मिनी मॅरेथॉनला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हे हिरवा झेंडा दाखवतील. या मॅरेथॉनमध्ये १२ वर्षावरील, १५ वर्षाखालील, १८ वर्षाखालील, १८ वर्षांपेक्षा मोठ, तृतीयपंथीय असे गट करण्यात आले आहेत. मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण समारंभ घाणेकर सभागृहात होणार आहे.

शनिवार, ११ मे रोजी होणाऱ्या मिनी मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्यासाठी लिंक – http://thanecitizens.org/mini-marathon-registration/ या लिंकवर नोेंदणी करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *