अनिल ठाणेकर
ठाणे : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात केलेले वक्तव्य हे अतिशय खालच्या पातळीचे असून निषेधार्ह आहे असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवाडा विधानसभेचे उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यबद्दलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात केलेले वक्तव्य हे अतिशय खालच्या पातळीचे असून पंतप्रधान या पदाला शोभणारे मुळीच नाही. देशाच्या पंतप्रधान पदावर बसून देशाची कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे देशाचे दुर्दैव आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक सर्वजण या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवाडा विधानसभेचे उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
