ठाणे  : प्रांजल मळेकर आणि प्रतीक्षा पोवारची शतकी भागीदारी  त्यानंतर तन्वी चव्हाण, कनिष्का सोलासे, आर्या कानडेच्या संतुलित गोलंदाजीमुळे स्पोर्टींग क्लब कमिटीने यंग मेन्स क्रिकेट क्लबचा १३१ धावांनी पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या डॉ, कांगा महिला बाद पद्धतीच्या क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९२ धावांचे आव्हान उभे केल्यावर यंग मेन्स क्रिकेट क्लबला ६१ धावांवर गुंडाळत स्पोर्टींग क्लब कमिटीने स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले.

सलामीची जोडी २८ धावांवर माघारी परतल्यावर प्रांजल आणि प्रतिक्षाने तिसऱ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करत संघाच्या धावसंख्येला मजबुती दिली. प्रांजलने ५९ आणि प्रतिक्षाने ५९ धावा केल्या. इशा मार्तेकर आणि नेहा राणेने प्रत्येकी दोन बळी मिळवले. आव्हानात्मक धावसंख्येचा बचाव करताना तन्वी चव्हाण,कनिष्का सोलोसे आणि आर्या कानडेने प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. तन्वी, कनिष्काने प्रत्येकी तीन आणि आर्याने दोन बळी मिळवत संघाच्या विजयाला मोठा हातभार लावला.  यंग मेन्स क्रिकेट क्लब संघाकडून इतर फलंदाज दु आकडी धावा करण्यात अपयशी ठरले असताना j केवळ भूमिका रायने  २२ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : ३५ षटकात ६ बाद १९२ (प्रांजल मळेकर ५९, प्रतीक्षा पोवार ६०, इशा मात्रेकर ७-३२-२, नेहा राणे ७-३५-२ ) विजयी विरुद्ध यंग मेन्स क्रिकेट क्लब : २१ षटकात सर्वबाद ६१ (भूमिका राय २२, तन्वी चव्हाण ५-१४-३, कनिष्का सोलोसे ३-९-३ , आर्या कानडे ४-१२-२).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *