आम्ही या देशातून इंग्रजांना घालवले तर मोदींचे काय घेऊन बसलात? अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल एका प्रचारसभेत केल्याचे वृत्त आहे.
आम्ही म्हणजे काँग्रेसने इंग्रजांना घालवले असा पवारांचा दावा आहे. मात्र इंग्रज खरोखरी गेले आहेत का याचा कधी पवारांनी विचार केला आहे का? अर्थात त्यांनी केला असेलही. मात्र वास्तव नेमके काय आहे हे त्यांना देशातील जनतेसमोर येऊच द्यायचे नाही. म्हणून ते असे विधान करीत असावेत असे म्हणता येऊ शकेल.
देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असे म्हटले जाते. मात्र त्यावेळी घडलेले घटनाक्रम आणि त्या काळातील ऐतिहासिक तथ्ये तपासलीत, तर आजही जगाच्या दृष्टीने स्वतंत्र देश असलेला भारत हा ब्रिटिशांचा मांडलिक देश आहे.
१९४७ पूर्वीच्या काळात जगातल्या जवळ जवळ ५४ देशांवर ब्रिटिशांची सत्ता होती. हे सर्व देश ब्रिटिशांच्या राणीचे गुलाम म्हणूनच ओळखले जात होते. त्यादरम्यान हळूहळू ब्रिटनने या सर्व देशांना मर्यादित स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली. या ५४ देशांचा कॉमनवेल्थ ग्रुप ऑफ कंट्रीज म्हणजेच राष्ट्रकुल समूह म्हणून ओळखला जाऊ लागला. यात भारत हाही समाविष्ट होता. इंग्रजांनी भारतावर ताबा मिळवला, तेव्हा हा देश हिंदुस्तान म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी हिंदुस्थानच्या सीमा या खाली श्रीलंकेपासून तर थेट अफगाणिस्तानपर्यंत पसरल्या होत्या. इंग्रजांनी अफगाणिस्तान स्वतंत्र केला. इकडे श्रीलंकेलाही वेगळ्या देशाचा दर्जा दिला. बाजूला ब्रह्मदेशलाही वेगळे केले. शेवटी उरलेल्या भारताचे जाताना भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. त्यातही बाजूला असलेल्या नेपाळला पुन्हा वेगळा देश म्हणून मान्यता देऊन टाकली, आणि उर्वरित देश तत्कालीन काँग्रेसजनांच्या हवाली केला.
त्यावेळी असे म्हणतात की पंडित नेहरूंना देशाचे पंतप्रधान होण्याची घाई झाली होती. महात्मा गांधींवर त्यांचा वरचष्मा होता. इंग्रजांनी जाता जाता महात्मा गांधी पंडित नेहरू प्रभृत्तींबरोबर करार केला. त्या करारानुसार भारत हा कॉमनवेल्थ ग्रुप मधीलच एक देश राहणार होता. या करारानुसार दरवर्षी १० अब्ज डॉलर्स इतकी रक्कम इंग्लंडच्या राणीला खंडणी म्हणून भारताला द्यायची होती. त्याचबरोबर ३० हजार टन गोमांस सुद्धा भारताने इंग्लंडला दरवर्षी द्यायचे होते. त्यावेळी सत्ता लालसेपोटी नेहरूंनी सर्व अटी मान्य केल्या.हा करार मान्य करवून घेत इंग्रज देश सोडून गेले, आणि त्यांनी देश नेहरू आणि गांधींच्या हवाली केला. इकडे मात्र सर्व देशवासीय दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल असे गीत गात स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागले. मात्र या कराराबाबत कोणालाच माहिती नव्हते. कारण इंग्रजांनी जाताना पन्नास वर्ष हा करार तुम्हाला जाहीर करता येणार नाही अशी अट घातली होती.
१९९७ मध्ये ही पन्नास वर्षे पूर्ण होत होती. इंग्रजांच्या दुर्दैवाने १९९६ मध्ये देशात गैर काँग्रेसी सरकार आले. भाजपचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. ते जर पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर १९९७ मध्ये कराराची मुदत संपल्यामुळे तो करार नव्याने केला गेला नसता, आणि इंग्रजांची गोची झाली असती. योगायोगाने अटलजींचे सरकार तेरा दिवसातच पडले. हे सरकार पाडण्यामागेही आंतरराष्ट्रीय शक्तींचा हात होता असे बोलले जाते. वरील मुद्दे लक्षात घेतले तर या तर्कात तथ्य असू शकते.
१९९७ मध्ये देशात काँग्रेसच्या पाठिंब्यावर आधी देवेगौडा आणि नंतर गुजराल यांचे सरकार सत्तारूढ होते. या काळात असे म्हणतात की सोनिया गांधींच्या मदतीने या कराराला २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळवून घेतली गेली. त्यामुळे अजून पर्यंत देशवासीयांना अधिकृतपणे याबाबतीत काहीही कळलेले नाही.
काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षातील एक अभ्यासू नेता निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्याचे मंत्रीपद गेले. परिणामी भरपूर रिकामपण होते. हा नेता काँग्रेसचा असूनही अभ्यासू असल्यामुळे त्याने संधीचा फायदा घेत आधी पीएचडीची पदवी मिळवली, आणि नंतर डिलीट ही पदवी मिळवली. या काळात पीएचडी साठी या नेत्याने १९२० पर्यंतचा स्वातंत्र्यलढा हा विषय अभ्यासाला घेतला होता. त्यानंतर डिलीट साठी या नेत्याने गांधी काळातील स्वातंत्र्यलढा आणि देशातील सत्ता हस्तांतरण हा विषय घेऊन विद्यापीठाची डिलीट मिळवली. यावेळी अशी अनेक अज्ञात तथ्ये या नेत्यालाही कळली. त्याने ही तथ्ये काही निवडक पत्रकारांच्या कानात सांगितली. तिथून हळूहळू कुजबूज सुरू झाली आणि आज समाज माध्यमावरही या प्रकारच्या पोस्ट्स व्हायरल होत आहेत.
१४ऑगस्ट १९४७ च्या रात्री आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या पहाटे संसद भवनात इंग्रजांनी पंडित नेहरूंना सत्ता हस्तांतरित केली. त्यावेळी पार्श्वभागावर आपल्या तिरंग्या झेंड्यासोबत इंग्रजांचा युनियन जॅक देखील होता. जर इंग्रजांची सत्ता जाणार होती, तर युनियन जॅक ठेवण्याचे कारण काय होते याचे उत्तर आजही मिळालेले नाही. आजही इंग्लंडच्या राणीला अब्जावधी रुपयांची खंडणी दिली जाते आहे. इंग्लंडला दरवर्षी गोमांसही पाठवले जात असावे. अर्थात त्याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही.
विशेष म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र होतो तेव्हा इतर देशांमध्ये त्यांना आपले दूतावास सुरू करता येतात. तसेच त्या देशांचेही दूतावास आपल्या देशात सुरू करता येतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर जगातील बहुतेक सर्व देशांचे दूतावास दिल्लीत आहेत, आणि आपलेही दूतावास त्या देशांमध्ये आहेत. मात्र ब्रिटनचा दूतावास आपल्या देशात नाही. त्या ऐवजी उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर आहे. तसेच लंडनमध्येही आपला राजदूत नसून हाय कमिशनर आहे. याला कारण आपण कॉमनवेल्थ ग्रुप ऑफ कंट्रीज मधील एक अजूनही आहोत. कॉमनवेल्थ म्हणजेच संयुक्त मालमत्ता, आज जागतिक स्तरावर आपण इंग्रजांची संयुक्त मालमत्ताच आहोत असे तर नाही ना. नजीकच्या भविष्यात इंग्रजांशी झालेला हा करार संपुष्टात येणार आहे. अशा वेळी जर देशात नरेंद्र मोदींसारखा खमका पंतप्रधान राहिला तर हा करार पुनरुज्जीवीत होणार नाही. त्यामुळेच या निवडणुकीत कसेही करून मोदींना सत्तेपासून रोखायचे अशी काँग्रेसची रणनीती आहे. जर मोदी सत्तेत आले तर काँग्रेसने केलेला हा करार उघड होईल, आणि देशाला वास्तव कळेल. तसे होऊ नये म्हणून मोदींना रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याचे बोलले जाते आहे. काही राजकीय अभ्यासकांच्या मते मोदींना रोखण्याच्या या सर्व प्रयत्नांना परकीय शक्तींचाही पाठिंबा असण्याची शक्यता आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर आम्ही इंग्रजांना घालवले हा पवारांचा दावा अगदी निरर्थक ठरतो. इंग्रज स्वतःहून गेले. मात्र जाताना तुम्हाला गुलाम न ठेवता मांडलीक करून गेले आहेत हे वास्तव तुमच्या पक्षाने आणि तुमच्या नेत्यांनी देशापासून लपवून ठेवले आहे. इंग्रज देश सोडून जाण्यात तुमचे फारसे कर्तृत्व नाही. तर इंग्रजांनी प्रशासनिक तडजोड म्हणून तुमच्याशी करार करून तुम्हाला स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळेच आजही म्हणजेच २०१४ पर्यंत आपल्या प्रशासनात इंग्रजांनी सुरू केलेल्या अनेक प्रथा परंपरा तशाच चालू होत्या. त्या बदलण्याचा जेव्हा मोदींकडून प्रयत्न झाला तेव्हा काँग्रेसने विरोध केलेला आहे. आम्ही इंग्रजांना घालवले तर मोदी काय हा पवारांचा दावा किती गांभीर्याने घ्यायचा याचा विचार आता या देशातील जनतेनेच करायचा आहे. इंग्रजांना तुम्ही घालवले नाही, त्यामुळे मोदींनाही तुम्हाला घालवणे इतके सहज शक्य होणार का याचा विचार शरद पवारांनी करावा इतकेच इथे सुचवावेसे वाटते.
