बदलापूर : महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी बदलापूरनजीकच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरातील विविध भागातील ग्रामस्थांबरोबर शनिवारी संवाद साधला. त्यानंतर बदलापूर शहरात कॉर्नर सभा घेऊन नागरिकांच्या सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कपिल पाटील यांनी बदलापूरच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. वडवली, साई, ढोके दापिवली, आंबेशिव, भोपीपाडा, चोण, राहटोली, जांभिलकर, मुळगाव, सोनावळे, कान्होर, काराव, भूइसावरे येथील ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेल्या कार्याची माहिती दिली.

या वेळी शिवसेनेचे अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबारी, गणेश पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, पूर्व विभागाचे अध्यक्ष संजय भोईर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर घोरपडे, शरद म्हात्रे, शिवसेनेचे पदाधिकारी सतीश खोत, राहटोलीच्या सरपंच राजश्री रेवाळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, कपिल पाटील यांनी बदलापूर शहरातील एरंजाड येथील नागरिकांबरोबरही संवाद साधला. तसेच त्यांना लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपाचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे, पंकज मेहेर, समीर मेहेर, जितेंद्र मेहेर आदींसह ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

बदलापूर शहरातील दत्तवाडी येथे शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील, वॉर्ड क्र. २ मध्ये समाजसेवक बंटी म्हसकर, भाजपाच्या माजी नगरसेविका वैशाली गिते व प्रदिप गिते यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील, बदलापूर पूर्वचे अध्यक्ष संजय भोईर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद तेली आदी उपस्थित होते.

बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचारसभेला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी निवडून देण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *