मुंबई : देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध विषयांमध्ये पीएचडीसाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट या परीक्षेची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १० मे होत.

यूजीसी नेट या परीक्षेचे नियोजन मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)च्या मार्फत केले जाते. यंदाही एनटीएमार्फत ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुका सुरू असल्याने अनेक शिक्षक, कर्मचारी हे या निवडणूक कामात असल्याने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १५ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच १६ ते १७ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकतात. ऑनलाईन प्रवेश अर्जात काही सुधारणा करायची असल्यास त्यासाठी १८ ते २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ugcnet.nta.ac.in या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल. यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १ हजार १५० रुपये प्रवेश शुल्क आहे; तर ईडब्लूएस, ओबीसी, एनसीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये आणि एसटी, एससी, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी ३२५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *