मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून, राज्यातील पाच टप्प्यांतील मतदानासाठी सुमारे नऊ हजार एसटी बस धावत आहेत.

राज्यातील अनेक मतदार मतदान करण्यासाठी शहरातून आपापल्या मतदारसंघात बसने प्रवास करत आहेत. अनेकांनी यासाठी तिकिटाचे आरक्षणदेखील केले. यापैकी अनेक बस स्थानकात आलेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आगार व्यवस्थापनाकडून बस मतदानाच्या कामाला गेल्याचे सांगितले जात आहे. आरक्षण केल्यानंतर बस रद्द करणे हे मतदान करायला जाणाऱ्या प्रवाशांची थट्टा करण्यासारखे आहे, अशा शब्दात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. सध्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या कामकाजासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *