अशोक गायकवाड
अलिबाग : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! असा दिलेला संदेश आपल्या समाजातील मुला मुलींनी शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उंच करावे असे मार्गदर्शन पंचशील बौद्ध मंडळ खंडाळे अलिबाग यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात समाज भूषण, आपत्तीव्यवस्थापन तज्ञ, रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.
व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष. मंगेश मोरे. उपाध्यक्ष. वैष्णवी कदम. प्रा. डॉ.जयपाल पाटील. उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन. त्रिशरण,पंचशील, घेण्यात आले. यानंतर पुरस्कार प्राप्त जयपाल पाटील यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविकात प्रा.जयपाल पाटील यांच्या समाजसेवेबाबत उपस्थित त्यांना माहिती व आपल्या समाज बांधवांना कायम आरोग्याबाबत मदत करणारे असून त्यांना अलिबाग तालुक्यात प्रथमच हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आपल्या मंडळामार्फत बोलावले आहे. यावेळी प्रा.जयपाल पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मोफत चालविले जाणारे अलिबाग, पनवेल, पाली व महाड येथील मुलींचे वसतिगृह व मुलांसाठी अलिबाग, तळा, महाड येथील व जावळी माणगाव येथील १०वी पर्यंतचे माध्यमिक विद्यामंदिर याचा आपल्या समाजातील गोरगरीब, गरजवंतांनी शिक्षणासाठी लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी कधी केव्हाही अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. आपली मुलगी बाळंतपणासाठी बाहेर आल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी १०२ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. पावसाळा आता जवळ आल्याने काही वेळा विजा कोसळतात त्यासाठी केंद्र सरकारने “दामिनी” ॲप काढला असून विजय बाबत सुरक्षेची माहिती मोबाईलवर कशी मिळते. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा ११२ क्रमांकाचा वापर कसा करावा. या माहिती सोबतच महिलांनी आपल्या घरातील गॅसची काळजी कशी घ्यावी सांगितले.त्याचबरोबर विहाराच्या ग्रंथालयास संविधानाची प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तक आपत्ती सुरक्षेची पुस्तके भेट दिली. यापुढे असा कार्यक्रम तालुक्यात जिल्ह्यात आपल्या समाजातील महिला पुरुषांसाठी बुद्ध विहारात करणार असल्याचे सांगितले. यावेळी अँड. अनुष्का गायकवाड, प्रीती रघुनाथ मोरे, प्रतिभा मोरे, पांडुरंग मोरे व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शन मंडळाच्या सचिव सिमरन ओहाळ यांनी मानले.
