24 कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे  रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे. 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाकरीता 1960 मतदान केंद्र असून, प्रत्येक मतदान केंद्रावर लागणारे ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स सील करण्याची प्रक्रिया आज करण्यात आली. सदरची प्रक्रिया उद्या 14 मे 2024 रोजी व  आवश्यकता भासल्यास 15 मे रोजी सुरू राहणार आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *