मुंबई : नाशिकला अवघ्या दोन तासांसाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत या जड बॅगात दडलयं काय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. -८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

 नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिसांना उचलताना नाकीनऊ येतील एवढ्या वजनाच्या बॅगा आणल्या होत्या, त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रातल्या ज्या भागात आज निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल महत्त्वाचा पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचे वाटप, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसत आहे. धंगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणे धरून बसले होते. पोलिसांच्या मदतीने पैशाचे वाटप होत आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील. ते पण आता आचारसंहिता असताना सही करू शकत नाहीत. आमच्या गाड्या तपासल्या जात आहेत मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं जात मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरचे देखील तपासणी झाली. मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स घेवून उतरत आहेत त्यांची तपासी कोण करणार, इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावर झापड आली आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. हेलिकॉप्टरची झडती झाली असती तर ९ बॅगा उतरल्या नसत्या. किमान १२ ते १३ कोटी रुपये नाशिकमध्ये आले. छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे हे किमान १५ ते २० सुटकेस घेऊन हॉटेल शालीमारला थांबले होते. त्यांनी पैशाचे वाटप केले होते, असा आरोप राऊत यांनी शिंदे यांच्यावर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *