मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मानले आभार

मुंबई :- १० राज्ये आणि ९६ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ब्रीजमोहन श्रीवास्तव, एस.आर. कोहली, ॲड. जलालुद्दीन, के.के. शर्मा, एम.ए.कुट्टी, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी खासदार वाय.पी. त्रिवेदी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे, आमदार अमोल मिटकरी आणि महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील मतदारांनी उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले आहे.

लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेता आपली सामाजिक बांधिलकी मजबूत करून देशातील सर्व नागरिकांसाठी उज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करते. भारत निवडणूक आयोग आणि राज्यांच्या निवडणूक यंत्रणेचेही कौतुक करताना काळजीपूर्वक केलेले नियोजन आणि अंमलबजावणीमुळे देशभरातील मतदान केंद्रावर सुरळीत मतदान पार पाडणे शक्य झाले आहे.  निवडणूक यंत्रणेच्या अथक परिश्रमांमुळे प्रत्येक मतदाराला मुक्तपणे आणि निष्पक्षपणे मतदान करण्याची संधी मिळाली आहे असेही ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

कर्तव्याप्रती जपलेल्या बांधिलकीबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी आभार मानले आहेत.

निवडणुका शांततेत पार पडतात तेव्हा याचा अर्थ लोकशाही आणि तिच्या मूल्यांप्रती आपली सामूहिक बांधिलकी मजबूत होते आहे. शांततापूर्ण लोकशाही प्रक्रियेसाठी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांनी काम करणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असून यामुळे देश आणि लोकशाही मजबूत होईल असेही ब्रीजमोहन श्रीवास्तव म्हणाले.  दरम्यान आपण देशाच्या लोकशाही आदर्शांना समर्पित केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पक्षाच्यावतीने ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *