मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत २० मे रोजी पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सुटीत गावी गेलेल्या मुंबईकरांनी मुंबईत येऊन मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते आर. जी. हुले आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या अलका हुले यांनी ग्रामीण भागातून ‘चलो मुंबई’चे बॅनर लावत मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. मे महिन्याच्या सुटीत अनेक मुंबईकर कुटुंबासहित गावी जात असतात. काही जण मतदान असतानादेखील मुंबईत येऊन आपले कर्तव्य बजावत नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी रायगडमधील आंबेगाव गावात ‘मतदानासाठी मुंबईत चला’, असे आवाहन बॅनरद्वारे केल्याचे आर. जी. हुले यांनी सांगितले.
