मुंबई  : घ्या दोनशे… बोला मनसे अशा शब्दात ठाकरे गटाच्या प्रवकत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि मनसे यांच्यावर हल्लाबोल केला
आहे. ठाण्यातील शिवसेना शिंदे गट उमेदवारांच्या एका प्रचार सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर करणाऱ्या बाई तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या कशा काय असा सवाल केला होता त्याला उत्तर देताना अंधारे यांनी हिशेब चुकता केला.
        राज ठाकरे वंदनीय बाळासाहेबांना मानतात का? असा सवाल करीत त्या म्हणाल्या तुमच्या निष्ठा घ्या २०० बोला मनसे अशी आहे का? तुम्ही माझा व्हिडीओ दाखवता, तेव्हा मी तर कुठल्या राजकारणात नव्हते. त्यामुळे घ्या दोनशे, बोला मनसे अशा माझ्या भूमिका नव्हत्या, असा जोरदार हल्ला अंधारे यांनी चढवला आहे.
सुषमा अंधारे मुंबईतील एका प्रचार रॅलीला संबोधित करत होत्या. त्यावेळी त्यांनी हा हल्ला चढवला. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत असं राज ठाकरे म्हणाले होते. तुमची पोरं कोण कोण खेळतो ते बघा. वसंत मोरे, प्रवीण दरेकर ते बघा. अन् यांनी नितेश राणे आणि निलेश राणेंना कडेवर घेतलं. कणकवलीत तुम्ही नारायण राणे यांच्या प्रचाराला का गेलात? राणे बाळासाहेबांबद्दल काय बोलायचे ते विसरलात का? घ्या दोनशे, बोला मनसे अशी तुमची अवस्था झाली आहे. बाळासाहेबांबद्दल निलेश राणे काय बोला ते ऐका. त्यांच्या बापाच्या प्रचारासाठी तुम्ही गेलात, ते काय म्हणाले ते कधी ऐकलंय का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
सध्या उठ दुपारी घे सुपारीचं राजकारण सुरू आहे. सुपारीबाज काहीतरी नवे मुद्दे घ्या. २७ वर्षापूर्वीचा एक व्हिडीओ तो आता दाखवत आहेत. हीच ती माणसं भाऊ मृत्यू शय्यवर असताना नक्कल करायची. अजित पवारांवर काहीही बोलायचे. आता त्यांचे गुणगान गात आहेत. कोणत्याही मुद्द्यावर ठोस भूमिका घेतल्या नाहीत. राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेस राजा आहे, असा हल्ला चढवत मी नागवंशी आहे. माझ्या नादाला लागू नका. मला बाई समजून हलक्यात घ्यायची नाही,असा इशाराही सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना दिला.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडगोळी राजकारणातून बाद झाली पाहिजे, असं हेच राज ठाकरे म्हणायचे. इतका खोटं बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही, असं राज ठाकरे म्हणायचे. देवेंद्र फडणवीस यांनी तर राज ठाकरे यांची अब्रुच काढलेली आहे. तरीही राज ठाकरे हे भाजपसोबत गेले. यालाच उठ दुपारी आणि घे सुपारी म्हणतात, असा हल्लाही त्यांनी चढवला.
अंधारे यांनी यावेळी भाजपवरही जोरदार टीका केली. राज्यात उद्धव ठाकरे यांचाच विजय होणार आहे. काही लोक आता जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारल्यावर यांच्याकडे उत्तर नसतं. मोदींची ५६ इंचाची छाती मीडियासमोर का जात नाही? मोदी पत्रकार परिषद का घेत नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मोदींना पत्रकार परीषद घ्यायला सांगावं असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *