माथेरान : माथेरानच्या जान्हवी सुरेश शिंदे हिने सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. जान्हवीने 94.96 टक्के गुण प्राप्त केले असून तिने ( मुंबई )परेल येथील सोशल सर्व्हिस लीग या शाळेतुन मार्च मध्ये दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला.  शिक्षिका मिस पद्मा, मिस भूमी लालन, मिस मीना मकवाना , मिस ताहीरा, मिस जरीन या  शिक्षकांनी उत्तम रित्या अभ्यास करून घेतल्याने इतके गुण प्राप्त करू शकले अशी भावना जान्हवी हिने व्यक्त केली व डॉक्टर बनण्यासाठी भरपूर मेहनत घेणार असल्याचे तिने सांगितले  जान्हवीचे पालक  सुरेश व अंकिता शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की आम्ही तिच्यावर अभ्यासाचे कोणतेही दडपण येऊ दिले नाही मोठ्या अपेक्षा लादल्या नाहीत तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे.

प्रा गवाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेंट झेव्हिएर्स शाळेचे शिक्षक योगेश जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे  , कुलदीप जाधव, वर्ष्या शिंदे , सुहासिनी दाभेकर यांनी जान्हवीचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *