नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अजित पवारांकडील आमदारांसाठी गुगली टाकला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलं आहे. या फुटीमुळे नवीन चेहरे पुढे आले असून तरुण मंडळी चांगलं काम करत आहे. ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तेथे परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल असे सांगत अजित पवारांकडील आमदारांसाठी परतीचा मार्ग आज जयंत पाटील यांनी खुला केला.
लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाचा धुव्वा उडणार असल्याचे सगळेच सर्व्हे सांगत आहेत. अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही असे सर्व्हे सांगतो. या पार्श्वभुमीवर बिथरणाऱ्या आमदारांना जयंत पाटील यांनी खुणावले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
यंदाचीनलोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील जनतेनं हाती घेतली आहे, जनतेला देशातील संविधान वाचवायचे असून जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत असल्याची खोचक टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासली असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
32 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असेही
जयंत पाटील यांनी सांगितले.
जीएसटीची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जाते. आंतरराष्ट्रीय किमती कमी असताना गॅस पेट्रोल डिझेल महाग झाले आहेत. त्यामुळे जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत असून 32 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील यांनी सांगितले की, नगर, नाशिक, जळगाव पुणे सह सर्वच कांदा उत्पादक क्षेत्रात कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मागील सहा महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काही, तरी आश्वासन देतील त्याला अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेली असून लाल कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झालं आहे. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी आश्वासने दिली. मात्र, खर्च दुप्पट झाल्याची टीका त्यांनी केली.
