मुंबई : घाटकोपरच्या होर्ल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे आहे. होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. या ढिगाऱ्याखाली पेट्रोलपंप असल्यामुळे ढिगारा हटवण्यास अडचणी येत आहेत. या अपघातातील मृतांच्या संख्येत अजुन वाढ होण्याची शक्यता आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ५० तास उलटून गेले आहेत. अजून देखील  NDRF आणि महापालिका आपत्ती सेवा आणि अग्निशमन  दलांकडून बचावकार्य सुरूच आहे. अजुनही ढिगारा उपसण्याचं काम बाकी आहे.

ढिगाऱ्याखालून 25 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने बाहेर काढल्या आहेत. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 75 जण जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

मुंबईला सोमवारी १०७ किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वादळी वाऱ्याचा तडका बसला होता. दरम्यान याप्रकरणी होर्डींग मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तर या होर्डींगचा मालक भावेश भिंडे अद्यापही फरार आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *