काजल – घुफ्रानला अग्र मानांकन
मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे रोजी लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात इंडियन ऑईलचा महम्मद घुफ्रानला तर महिला एकेरीत इंडियन ऑईलच्याच काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन शनिवार १८ मे ला सकाळी ९ वाजता होणार असून पुरुष एकेरी व महिला एकेरी या दोनही गटांच्या सामन्यांनी स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिल्या ८ विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे
पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ), २) संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ), ३) फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ), ४) ओमकार टिळक ( ए. के. एफ.), ५) ओमकार नेटके ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ), ६) अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ) ७) प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ), ८) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ),
महिला एकेरी : १) काजल कुमारी ( इंडियन ऑइल ), २) अंबिका हरिथ ( रिझर्व बँक ), ३) उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ), ४) रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस ), ५) निलम घोडके ( पोस्ट ऑफिस ), ६) वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी. ), ७) सेजल लोखंडे ( डी. के. सी. सी. ), ८) रुची माचिवाले ( ए. के. एफ. )
