मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) वसाहतींच्या भाडेपट्ट्यात सरसकट करण्यात आलेली वाढ कमी केली जाण्याची शक्यता आहे. या वाढीविरोधात रहिवाशांनी जोरदार नाराजी व्यक्त केल्यानंतर म्हाडा उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी आढावा बैठक बोलावली होती.
भाडेपट्टा रेडी रेकनरशी जोडल्यानंतर झालेली वाढ भरमसाट असल्याचा आरोप केला जात होता. अखेर याबाबत फेरविचार करण्याच्या दिशेने म्हाडा प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत.
पूर्वी हा भाडेपट्टा रेडी रेकनरशी जोडलेला नव्हता. त्यामुळे फारच अल्प भाडेपट्टा भरावा लागत होता. याबाबत ओरड झाल्यानंतर या धोरणाचा फेरविचार करण्याचे आश्वासन म्हाडाने दिले.