नवी मुंबई : मा. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा पाचवा टप्पा दि.२० मे २०२४ रोजी घोषित झालेला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कामकाजासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यास्तव दि.18/05/2024 ते दि.20/05/2024 रोजी निवडणूक कामकाज संपेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन बस प्रवर्तनाकरिता कमी बसेस उपलब्ध होणार असल्यामुळे वेळापत्रकात अनियमितता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर दिवशी काही प्रमाणात होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशी जनतेकडून सहकार्य मिळणेस परिवहन प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.