स्टंप व्हीजन
स्वाती घोसाळकर
वानखेडे मैदानावर लखनौ सुपर जाइन्टविरुद्ध खेळलेला सामना मुंबई इंडियन्ससाठी फक्त एक औपचारीकता होती. २०२२ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने लीगमध्ये सर्वात शेवटचं स्थान पटकावलं होतं. यावर्षीसुद्धा मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील उर्वरीत ९ टीमला पहिले आप करीत पराभवावर पराभव स्वीकारत तळाचे स्थान कायम राखले. ते आधीच फायनलच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे हा सामना फक्त औपचारीकता उरकणारा होता हे नक्की.
गेल्यावेळी टीम तळाला गेली म्हणून रोहीतची कॅप्टन्सीवरून उचलबांगडी करून गुजरातच्या हार्दीकला वाजत गाजत मुंबई इंडियन्सचे कॅप्टन केले. पण रिझल्ट मात्र तोच राहीला. मुंबईचा शो फुल टू फ्लॉप ठरला. आणि याचा मानकरी ठरलेल्या हार्दीकचा मुंबईकरांनी आजही यथेच्छ हुर्यो उडवला.
सामना जरी औपचारीक असला तरी काल ‘हिटमॅन इज बॅक’ म्हटलं तर वावग ठरणार नाही. रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. जणू अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा सराव तो करत होता. दरम्यान पावसामुळे काही काळ खेळ थांबण्यात आला होता. पण त्याचा कोणताही परिणाम रोहितच्या खेळावर जाणवला नाही. एक सणसणीत षटकार ठोकत अवघ्या २८ चेंडूत रोहितने आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली. दुसरीकडे मात्र इंडियन्सच्या विकेट लवकर गेल्या. नवीन उल हकने ब्रेवीसला बाद केलं. कुणाल पंड्याने उत्कृष्ट झेल घेत ब्रेवीसला बाद केलं. त्यानंतर इन्फॉर्म सूर्याही शून्यावरचा पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित मोठा स्कोअर करेल असं वाटतं असताना एका साध्या चेंडूवर रोहित बाद झाला आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियमवरील फॅन्स निराश झाले. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना डाव सावरता आला नाही आणि २१४ धावांचा पाठलाग करताना २० षटकात मुंबई इंडियन्सने सहा बाद फक्त १९६ धावांच करू शकला आणि लखनौ सुपर जाइन्टने हा सामना १८ धावांनी जिंकला.
याआधी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंडियन्सने या सामन्यात बूमराहला विश्रांती दिली तर त्याच्याएवजी सर्जून तेंडुलकरला संधी देण्यात आली. डावाच्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सच्या तुषाराने देवदत्त पडीक्कलला शून्यावर बाद करत लखनौ सुपर जाइन्टला मोठा धक्का दिला. पण लखनौचा कर्णधार के. एल. राहुलने डाव सावरला. त्याने सुरुवातीला स्टोईनीस आणि त्यानंतर पूरणबरोबर भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मुंबई इंडियन्सच्या पीयूष चावला आणि तुषाराने एलएसजीला रोखलं. दोघांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. आणि एलएसजीने ६ विकेट गमावत २१४ धावा केल्या.