वीजपुरवठा पुर्ववत करण्याची कामे युध्दपातळीवर

रायगड : दि.१३ मे २०२४ रोजी वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे रायगड जिल्हा हवामान विभगाकडून खबरदारीच्या सूचना करण्यात आले होते. या दिवशी, कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार, वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने,वीज पुरवठ्याची वाताहात होऊन, तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. बऱ्याच  ठिकाणी उच्चदाब व लघुदाब  वाहिनीचे पोल पडले होते, विद्युत रोहित्र निकामी झाले होते. आशा प्रसंगी महावितरण कर्जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून खंडित वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे प्रयत्न करीत होते. सोमवारी झालेली पडझडीमुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येत होता व बहुतांशी भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे .

परंतु दि. १६ मे २०२४ रोजी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने व भोगावणाऱ्या वाऱ्याने कर्जत तालुक्यात पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे महावितरणचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नेरल इन्कमर उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल, कडाव उच्चदाब  वाहिनीवर १७ पोल व अंजप उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल पडल्याच्या घटना संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारस समोर आलेले आहेत. प्रसंगी लघुदाब  वाहिनीचे अंदाजे ५० पोल पडले आहेत. या घटनेमुळे कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावांचा वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांना वीजपुरवठा विना गैरसोय होत आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे क्षतीग्रस्त वीजवाहिन्या, पोल, डीपी , इत्यादी   महावितरण तर्फे सदर काम लवकरात लवकर करण्याचा अथक प्रयत्न चालू असून, सदर वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे कामे युध्दपातलीवर  सुरु आहेत.  तरी, महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी कर्जत तालुक्यातील वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे अहवान केले  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *