मुंबई : बोरिवली पश्चिम येथे एका इमारतीत दिलीप त्रिवेदी यांचा फ्लॅट असून २०१६ मध्ये त्यांनी दुष्यंत सोनी यांच्या कुटुंबीयांना भाड्याने राहायला जागा दिली. कोरोना काळातही त्रिवेदी यांनी सोनी यांना घरात भाड्याने राहायला दिले. त्यानंतर एकत्रित भाडे म्हणून सात लाख ८८ हजारांचा चेक दिला व मालकाला फ्लॅट सुमारे ९५ लाखांना विकायचा आहे, असे सांगून याचिकाकर्त्याने फ्लॅटचा ताबा सोडण्यास नकार दिला. फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी याचिकाकर्त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर त्याला अटकही झाली. अखेर प्रतिवादी रूम मालकाने घर भाडे नियंत्रण कायदा कलम २४ अंतर्गत घर रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली. कोकण विभागीय मंडळाकडे या विरोधात याचिकाकर्त्यांनी धाव घेतली; मात्र कोकण विभागीय मंडळाने याचिकाकर्त्यांला दिलासा देण्यास नकार देत उच्च न्यायालयात याविरोधात दाद मागितली.

प्रतिवादी घरमालक दिलीप त्रिवेदी यांच्या वतीने ॲड. यशोदीप देशमुख आणि ॲड. अमोल कांबळे यांनी बाजू मांडली. सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा न्यायालयाने याचिकाकर्त्यांला दिलासा देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *