करणार लाखोंची कमाई
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी २४६ एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून त्यातून ९० लाखांचे उत्पन्न एसटीच्या मुंबई विभागाला मिळणार आहे.
एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे ८५०० ते हजार रुपये मिळणार आहेत. तीन टप्पे झालेत. राज्यात मतदानाचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचाही त्यामध्ये समावेश आहे.
