राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या प्रयागराज सभेत अभूतपूर्व गर्दी
सभेत माईक बंद पडला
बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
राहुल गांधीने घेतली अखिलेशची मुलाखत
प्रयागराज : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या सभेला उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अभुतपुर्व अशी विक्रमी उच्चाकांची गर्दी उसळली. त्यात ध्वनी यंत्रणा कोलमडल्यामुळे माईक बंद झाले. मग राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचे विचार एकण्यासाठी उपस्थित जमावाने बॅरिकेट तोडत स्टेजजवळ धाव घेतली. अगदी काही फुटांवर उसळलेल्या या अलोट गर्दीला राहुल आणि अखिलेश हसतुखाने सामोरे गेले. सुरक्षेची कोणतीही भीत न बाळगता राहुल गांधी यांनी माईक बंद असल्यामुळे अखेर अखिलेश यादवांची भर स्टेजवरच ९ मिनिटांची मुलाखत घेतीली आणि सोशल मीडियावर ती व्हायरल केली. त्यानंतर या सभेचे रुपांतर जणू रोड शोमध्ये झाले. जमावाचे अभिवादन स्वीकारून या दोघांनी पुढील सभेकडे कुच केली. फुलपूर लोकसभा मतदारसंघात राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त जाहीर सभा होणार होती. याठिकाणी अभूतपूर्व गर्दी झाली.
यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, भाजप आमच्या, तुमच्या आणि संविधानाच्या मागे लागली आहे. संविधान वाचले तर नोकऱ्या उपलब्ध होतील. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे ते म्हणाले. त्याचवेळी राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदींनी 22 लोकांना अब्जाधीश बनवले, पण आम्ही देशातील करोडो लोकांना करोडपती बनवू. करोडो गरिबांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातून एका महिलेचे नाव निवडले जाईल. त्यानंतर करोडो महिलांच्या खात्यावर दरमहा ८५०० रुपये पाठवले जातील.