ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील भिवंडी, कल्याण, ठाणे या तीनही लोकसभा मतदारसंघातील कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राधर पोहचले आहेत. मतदान साहित्य वाटप आणि ते मतदान केंद्रांवर घेऊन जाणे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तम असे नियोजन केले आहे.
