माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार दि. 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे.
पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे
-महेंद्र थोरवे
आमदार, कर्जत विधानसभा
