विक्रमगड : पालघर लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने विक्रमगड नगरपंचायत हद्दीत पोलिस ठाण्यातर्फे रूट मार्च काढण्यात आला.
पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पिंगळे यांच्या सूचनेनुसार विक्रमगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये केरळचे सीएफएफचा एक अधिकारी, ५० जवान आणि विक्रमगड पोलिस ठाण्याचे चार अधिकारी, १५ पोलिस सहभागी झाले होते.
