भिवंडी : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिवेअंजुर गावातील प्राथमिक शाळेतील बूथ क्र. ३१८ मध्ये कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दिवेअंजुर येथील गावात कपिल पाटील यांनी कुटुंबियांसह सकाळी सव्वासातच्या सुमारास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांचे पत्नी सौ. मीनल यांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी श्री शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. वडील स्व. मोरेश्वर पाटील, भाऊ स्व. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रतिमांना वंदन करून आशीर्वाद घेतले. देशहित व राष्ट्रहितासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता मतदारांनी मतदानाचा हक्क बजाावावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले होते.
